🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाचं कामकाज सुरु झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे.गेल्या वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यपालांनी मांडला. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने उत्तम काम केल्याचे त्यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी राज्यापालांनी अभिभाषणात वस्तू आणि सेवा कराच्या भरपाई रकमेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, 29 हजार 290 कोटी रुपयांची GST ची भरपाई केंद्राकडून येणं बाकी आहे.
राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केले आहे. राज्य सरकारनं कोरोना संदर्भात मदतीसाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत. अस राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वरळी : कोरोनाचे नियम फक्त गरिबांसाठी ? पबमधील व्हिडीओ शेअर करत मनसेच्या नेत्याने केला भांडाफोड
- सायकलवर विधानभवन गाठत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध !
- हुश्श! शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला; महावितरणने वाढवून दिली मुदत
- राम मंदिर उभारणीसाठी जालना जिल्ह्यातून १३ कोटी रुपये निधी संकलीत
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम; अभिभाषणात राज्यपालांनी केले राज्य सरकारचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
