औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी १ मार्चपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील ज्येष्ठ नागरिकांना ७ मार्चपासून लस मिळणार आहे. त्याकरिता कोविन अॅपद्वारे ऑनलाईन नोंदणी आणि महापालिकेच्या बुथवरही नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने लसीकरण होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी १ मार्चपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना लवकरच प्राप्त होतील. महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षावरील) ७ मार्चपासून कोरोना लसीकरण सूरू केले जाणार आहे. त्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना कोविन अॅपव्दारे नाव नोंदणी करता येईल. ज्यांना कोविन अॅपव्दारे नोंदणी करता येणे शक्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने सूरू केल्या जाणार्या बुथवर नाव नोंदणी करून त्यांची पडताळणी होवून लगेच लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती कोरोना लस दिली जाणार, लसीचा साठा कसा प्राप्त होणार याबद्दलच्या मार्गदर्शन सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्यातरी त्या लवकरच प्राप्त होतील. खासगी रुग्णालयाना देखील कोरोना लस पुरविली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त होणारर्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- वरळी : कोरोनाचे नियम फक्त गरिबांसाठी ? पबमधील व्हिडीओ शेअर करत मनसेच्या नेत्याने केला भांडाफोड
- सायकलवर विधानभवन गाठत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध !
- हुश्श! शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला; महावितरणने वाढवून दिली मुदत
- राम मंदिर उभारणीसाठी जालना जिल्ह्यातून १३ कोटी रुपये निधी संकलीत
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम; अभिभाषणात राज्यपालांनी केले राज्य सरकारचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
