Share

काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता.

वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनीनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवाल केला. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसवर जेव्हा असे आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

संजय राठोड यांनी आपल्या राजीनाम्यानंतर, ‘कोणत्याही प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याचे परिणाम भोगावे लागले पाहिजे,’ असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच, राजीनामा मुख्यमंत्र्यांना सोपवला असला तरी चौकशीनंतरच काय तो निर्णय घ्यावा अशी विनवणी देखील त्यांनी केल्याचे समजते यावरूनच नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

‘काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी,’ असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. पुढे त्यांनी भाजपवर देखील प्रहार केला. ‘भाजपला घाई झाली आहे, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही, त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतीलच,’ असं देखील ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!