🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्या विरोधात गेले अनेक दिवस भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्या वारंवार करत आहेत.
यामुळे दबावात असलेल्या शिवसेनेला त्यांचा राजीनामा घेतल्या शिवाय सध्या तरी कोणताही पर्याय समोर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला तयार असल्याचे देखील सांगितले आहे. परंतु जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा मंजूर करू नये, अशी अट संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घातलेली असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘इथलं सरकार भक्कम आहे भाजपने आता #JobKiBaat केली पाहिजे’
- बहन मायावती आरपीआय मध्ये आल्यास त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू – रामदास आठवले
- राज्यात फक्त सत्ताधर्म सुरू – उपाध्ये
- अंकिताचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं अनफॉलो ; सुशांतचे चाहते म्हणाले…
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
