🕒 1 min read
लखनौ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लखनौ च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सद्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी हे मोदी सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेस चे काही भले होणार नाही,’ असा टोला रामदास आठवले यांनी राहुल गांधींना लगावला आहे.
मायावती आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी आरपीआयचे दरवाजे खुले
रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे.त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी रिपाइंत आले पाहिजे.माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आणि भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपाइंत यावे. बहन मायावती या आरपीआय मध्ये आल्यास त्यांना रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष करू.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 28, 2021
रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !
- बहन मायावती आरपीआय मध्ये आल्यास त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू – रामदास आठवले
- राज्यात फक्त सत्ताधर्म सुरू – उपाध्ये
- अंकिताचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं अनफॉलो ; सुशांतचे चाहते म्हणाले…
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
