Share

आश्चर्यम! बीड जिल्ह्यात भाजपच्या मदतीला धावली शिवसेना

Published On: 

बीड : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असेच समीकरण पाहायला मिळत आहे. पण बीड जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर आणि त्यांचे चुलते शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यातून विस्तवही जात नाहीये.

विकासकामांच्या मुद्द्यावरून स्थानिक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी कुरबुरी सुरूच असतात. त्यातच काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी समर्थक ५ नगरसेवक शिवेसेनेत डेरेदाखल झालेत. तेव्हापासून ही धुसमूस वाढली आहे. त्यानंतर आता पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदिप क्षीरसागर हे बीड नगरपालिकेला टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

मात्र, यात एक विशेष बाब अशी की, क्षीरसागर यांनी निवेदनात गेवराईच्या नगर परिषदेचाही उल्लेख केला आहे. पालकमंत्री हे गेवराई नगर परिषदेला लक्ष करत राजकीय द्वेषातून सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यान्वयन यंत्रणा म्हणून निर्देशित करत आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. गेवराई पालिकेवर भाजप आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्त्वाखाली एकहाती सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेने भाजपला साथ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!