Share

‘जयदत्त क्षीरसागरांनी धनजंय मुडेंवर टीका करू नये, अन्यथा..’

Published On: 

🕒 1 min read

बीड : राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून यायचे. लोकसभेला राष्ट्रवादीत राहून भाजपचे काम करायचे व विधानसभेला शिवसेनेशी घरोबा करायचा, हे कोणत्या नैतिकतेत बसते? वर एवढं सगळं करून पुन्हा पालकमंत्र्यांच्या नावाने बोटे मोडायची, म्हणे सत्तेचा गैरवापर. मागील पस्तीस वर्षांत सत्तेचा गैरवापर कोणी, कुठे आणि कसा केला हे बीड शहरातील जनतेला माहीत आहे. पुन्हा पालकमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप कराल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी टीका नगर पालिकेचे गटनेते फारूक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमच्यामुळे २०१२ सालचा सुभाष रोड व भाजी मंडईतील सिमेंट रोड २०१७ ला करावा लागला. २०१४ चा जिल्हा रुग्णालय, रिपोर्टर भवन ते बशीर गंज सिमेंट रोड २०१८ ला करावा लागला. यादी द्यायचीच म्हटला तर खूप मोठी आहे. एखादी बाब तुमच्या मनाविरुद्ध घडली म्हणजेच तुम्ही बरोबर आणि समोरचा खोटा असे होत नाही.

उलट शिवसेनेशी घरोबा केल्यामुळे अद्याप तुमच्यावर पक्षांतर बंदीची कार्यवाही झालेली नाही याबद्दल स्थानिक पक्ष नेतृत्वाचे आभार माना. तुमच्या काल्पनिक घरच्या भांडणात पालकमंत्र्यांना विनाकारण ओढू नका. शहरातील विकास कामांसाठी आम्ही आमचे नेते पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोललो आहोत. प्रशासकीय पातळीवर बोलून मार्ग निघेल. तसे न करता बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा इशारा पटेल, नाईकवाडे यांनी जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!