Share

गर्भपात केलेली पूजा राठोड आणि ही पूजा चव्हाण एकच; चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Published On: 

पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

याच प्रकरणा संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्याचा दौरा करत ज्या इमारतीवरून पूजा चव्हाणने उडी मारत जीवन संपवलं त्या इमारतीची पाहणी केली. यानंतर, त्यांनी थेट वानवडी पोलीस ठाण्यात दाखल होत सदर प्रकरणाच्या चौकशी बाबत पोलिसांना विचारणा केली. पुणे पोलिसांची भूमिका ही संदिग्ध असून ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत आहेत त्यावरून साफ समजतय की ते अत्यंत दबावात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर सविस्तर भाष्य केलं. दरम्यान, यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सौ.पूजा अरूण राठोड नावाच्या महिलेची गर्भपात झाल्याची नोंद आहे. गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव सौ. पूजा अरुण राठोड आणि वय २२ वर्ष दाखवण्यात आले. त्यामुळे संशय वाढला आहे. पूजा चव्हाणने बनावट नाव सौ पूजा राठोड धारण करून गर्भपात केला असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

यावर देखील चित्रा वाघ यांनी भाष्य करत पूजा राठोड हीच पूजा चव्हाण असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. ‘यवतमाळमध्ये ज्या पूजा राठोडचा गर्भपात करण्यात आला आणि पुण्यात आत्महत्या करणारी पूजा चव्हाण ही एकच आहे. यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर नसलेला डॉक्टर गर्भपात करतो. दुसऱ्या दिवशी त्याची आई आजारी पडते आणि तो रजेवर जातो, अशा प्रकारचा योगायोग गेल्या 20 ते 24 वर्षांच्या सामाजिक जीवनात बघितलेला नाही,’ असं म्हणत त्यांनी संताप देखील व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!