Share

कौतुक तर होणारच…! अक्षर पटेलच्या फिरकीची जादू एकाच कसोटीत घेतले ११ बळी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपण्याची चिन्हे आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून येत आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर काल भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. आता, भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून विजयासाठी केवळ ३८ धावांपासून भारत दूर आहे. सद्या, रोहित शर्मा व शुबमन गिल हे खेळत आहेत. ११ धावांवर शून्य बाद अशा स्थितीत भारतीय संघ आहे.

अक्षर पटेलची कमाल –

अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले होते. यानंतर, दुसऱ्या डावातही अक्षर पटेलच्या फिरकीची कमाल पाहायला मिळाली. पहिल्याच षटकात २ गडी शून्यावर बाद करून माघारी धाडल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव देखील कोसळला. या डावात अक्षराने ५ बळी पटकावले. त्यामुळे या कसोटीमध्ये तब्बल ११ बळी घेऊन त्याने जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मधील पहिल्याच सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!