🕒 1 min read
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला आता भारताच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून २०१७ साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाले होते. यानंतर, दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती.
त्याला भारताकडे सोपवले जावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. अखेर आज या प्रयत्नांना यश आलं आहे. नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदी विरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
नीरव मोदीच प्रत्यार्पण होणार असल्याने हे मोदी सरकारच्या प्रयत्नांचं यश असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. ‘ब्रिटनच्या न्यायालयाकडून भारताला हवा असलेल्या आर्थिक गुन्ह्यातील फरारी आरोपी निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा… मोदी सरकारच्या चिवट झुंझीला अखेर यश…’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
ब्रिटनच्या न्यायालयाकडून भारताला हवा असलेल्या आर्थिक गुन्ह्यातील फरारी आरोपी निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा… मोदी सरकारच्या चिवट झुंझीला अखेर यश… pic.twitter.com/uvs8ujpxJ4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 25, 2021
नीरव मोदीला मुंबईच्या कारागृहात ठेवणार !
अखेर दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर भारताला यश आलं आहे. नीरव मोदीची मानसिक स्थिती व प्रकृती प्रत्यार्पणासाठी योग्य नसल्याचा दावाही लंडन कोर्टाने फेटाळून लावला. आर्थर रोडच्या बॅरेक 12 मध्ये नीरव मोदीला ठेवण्यात येणार असल्याच्या आश्वासनांनाही न्यायालयाने समाधानकारक म्हटले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 मध्ये ठेवावे. त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकसंख्या वाढविणे हे मर्दानगीचे काम आहे,ज्याच्यामध्ये दम असेल ते वाढवू शकतात – अख्तरुल इमान
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला : निलेश राणे
- इंधन दरवाढीचा निषेध करत इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याला तुम्ही ओळखलं का ?
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
