🕒 1 min read
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर आणि त्यांचे चुलते तथा शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचे अजिबात पटत नाहीये. यामुळे बीडच्या राजकारणात त्या दोघांसह त्यांच्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. कधी कामांच्या श्रेयवादाची लढाई, कार्यकर्त्यांची पळवापळवी अशा एक ना अनेक मुद्द्यावरून बीडचे राजकारण चर्चेतच असते.
आता काका-पुतण्यांतील वाद आणखी एकदा समोर आला आहे. यावेळेस त्याचे निमित्त ठरले आहे एका रस्त्याचे. बीड तालुक्यातील बोरफडी ते मोहगीरवाडी आणि लक्ष्मीनगर या ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयत्न करून २ कोटी ३५ लाखांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंत्री असतानाच मंजूर करून घेतला होता. त्याचे उद्घाटनही केले होते. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हे काम थांबले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्याच रस्त्याच्या उद्घाटनाचा नारळ फोडून श्रेय लाटण्याची हद्दच ओलांडल्याचा आरोप शिवसैनिक बिभीषण संदिपान घुगे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
बोरफडी आणि परिसरातील अनेक गावांना रस्त्यांची कामे मंजूर करून घेण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी हे प्रस्ताव दाखल करून निधी मंजूर करून घेतला व ती कामेही सुरू केली होती. परंतु, काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ही कामे थांबली होती. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विकासाची कामे बंद अवस्थेतच होती, हे काम कुणी आणले? यासाठी निधी कुठून मिळाला? किंवा यासाठी कुणी प्रयत्न केला याचा सारासार विचार न करता आमदार संदीप क्षीरसागर यांनी या ठिकाणी जाऊन उद्घाटनाचा नारळ फोडला.
एवढेच नव्हे तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बदनाम करण्यासाठी बिभीषण राजाराम घुगे यांना कार्यक्रमाला बोलावून घेत वृत्तपत्रांना बातम्या पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप बिभीषण घुगे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत
- वाह रे मनपा! २६ लाख औरंगाबादकरांवर वचक ठेवण्यासाठी फक्त ५० कर्मचारी
- पॉझिटिव्ह विचाराने नोकरीसाठी गेले अन् कोरोना पॉझिटिव्हच निघाले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
