Share

औरंगाबाद मनपाच्या विरोधात व्यापाऱ्यांकडून बंदची हाक

Published On: 

औरंगाबाद : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देत यामध्ये औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व संलग्न संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा चेंबर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांना लावण्यात येणाऱ्या व्यवसाय परवाना करास व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदी विरोधात हा बंद देशव्यापी व्यापाऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्याच्या मसुद्यात असलेल्या जटील तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात या बंदला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड ट्रेड, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे.

भारत बंदला देशातील चाळीस हजार संघटना, आठ करोड व्यापाऱ्यांनी या बंदास पाठिंबा दर्शविला आहे. सर्व व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जाचक अटीच्या विरोधात उद्या लढा पुकारणार आहेत. भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटीस न देता माल जप्त करणे, जीएसटी रद्द करणे, रिटर्न्स भरु न देणे, गुन्हे दाखल करणे बंद करावे ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. व्यापाऱ्यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील असे कायद्यात बदल घडवून आणावे. सर्व तालुका, ग्रामीण, शहर संघटना, सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करुन भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!