औरंगाबाद : कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने आता कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच दुकानात एकावेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा. तसेच प्रत्येक ग्राहकाची ऑक्सिमिटरद्वारे ऑक्सिजन लेव्हल व थर्मलगनच्या सहाय्याने ताप तपासावा, अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र संपूर्ण शहरात दुकानांमध्ये जात तपासणी करण्यासाठी पथकांची कमतरता भासत आहे. आजघडीला पालिकेच्या नागरी मित्र पथकांमध्ये केवळ ५० कर्मचारी कार्यरत आहेत.
मागील आठवडाभरापासून शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा प्रयत्न करत असून विविध उपाययोजना राबवित आहे. याविषयी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी यापूर्वीच्याच नियमावलीचा वापर केला जात आहे.
पालिकेने प्रत्येक दुकानदारांसाठी नियमावली शासन निर्देशान्वये जाहीर केली होती. ग्राहकांची नोंदणी करण्यासोबतच ऑक्सिमिटरने ऑक्सिजन लेव्हलची तपासणे, थर्मलगनच्या माध्यमातून ताप तपासणी करणे. यात कोणी संशयास्पद आढळून आल्यास पालिकेला संपर्क करण्याचे आवाहन त्यावेळी केले होते. हीच नियमावली आता कोरोना संसर्ग वाढत असल्याने नव्याने लागू केली आहे, असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना नियमांची अंमलबजावणी कशी करणार?
कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे क्रमप्राप्त आहे. आजघडीला शहराची लोकसंख्या २६ लाख एवढी मानली जाते. मात्र पालिकेच्या नागरी मित्र पथकांमध्ये केवळ ५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवणे अवघड आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत
- हर्सूल तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
- काँग्रेस नेते राहुल गांधींनी लुटला केरळमध्ये समुद्र सफारीचा आनंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
