Share

हर्सूल तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Published On: 

औरंगाबाद : बहीण रागावली म्हणून शहरातील १९ वर्षीय तरुणी ही हर्सूल येथील तलावात आत्महत्या करण्यासाठी गेली होती. पण तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवत सदर तरुणीचा जिव वाचवला. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हर्सूल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील जळगाव रोड परिसारात ही तरुणी राहते. घरात झालेल्या किरकोळ वादातून बहीण रागावली म्हणून अपमान वाटल्याने रागाच्या भरात तरुणी बुधवारी दुपारी हर्सूल तलावाकडे आली होती. प्रथम ती मुख्य गेटने आत शिरली पण तिथे सुरक्षा रक्षक असल्याने तिने आपला मोर्चा सांडव्याकडे वळवला. त्या ठिकाणी काही तरुण पोलिस भरतीचा सराव करत होते. या तरुणाना संशय आल्याने त्यांनी सुरक्षा रक्षक कैलास वाणी व राजेंद्र गवळी यांना कल्पना दिली. मग सुरक्षा रक्षक तरुणी गेलेल्य दिशेने गेले आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरुणीला घरी फोन करायला सांगितला असता तिने फोन पाण्यात फेकून दिला.

यामुळे सुरक्षा रक्षकांनी हर्सूल पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. तत्काळ हर्सूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गिरी यांनी दामिनी पथकास घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी विश्वासात घेऊन या तरुणीची विचारपूस केली. तेव्हा घरात बहीण रागावल्यामुळे अपमान वाटल्यामुळे रागाच्या भरात आपण आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे तिने सांगितले. पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला निंभोरे, श्रुती नांदेडकर, कविता धनेधर यांनी या तरुणीची समजूत काढली आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!