🕒 1 min read
हिंगोली : जिल्ह्यात आणखी २७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ९ जणांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत ५८ वर असलेली जिल्ह्याती अॅक्टिव्ह रुग्णांची सख्या आता १५८ वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ३ हजार ७३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
शहरात १२ कंटेनमेंट झोन जाहीर
हिंगोली शहरात गेल्या काही दिवासांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शहरात १२ कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर, बयाणीनगर, गांधी चौक, तालाब कट्टा, कोमटी गल्ली, मारवाडी गल्ली, ग्रामीण पोलिस स्टेशन, शिवाजीनगर, विवेकानंद नगर, पोस्ट ऑफिस रोड, जिजामातानगर, टीव्ही सेंटर या ठिकाणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही ५ ठिकाणी बंधने घालण्यात आली आहेत. यामध्ये समगा, सावरगाव बंगला, इंचा काळकोंडी जोडतळा या गावांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुलांनाे, आई-बाबांनी बाहेर जाताना मास्क घातला की नाही ते पाहा; आरोग्य मंत्र्यांचे शाळकरी मुलांना पत्र
- मराठा आरक्षणाचा लढा तीव्र; ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाची तयारी सुरू
- भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांचे चुलत बहीण-भाऊजी ठार
- जालन्यात तिसऱ्या दिवशीही बाधितांचा आकडा शंभरीपार; १११ नवे रुग्ण, ६६ रुग्णांना डिस्चार्ज
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
