Share

आखेर नायगाव येथील दारुबंदीला मिळाला हिरवा कंदिल

Published On: 

🕒 1 min read

नांदेड: जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील महिलांच्या लढ्याला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर त्यानी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे येत्या २ मार्च रोजी होणाऱ्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारी सरपंच नागेंद्र सूर्यकार व ग्रामसेवक जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या पार पडलेल्या मासिक बैठकीत हा निर्णय झाला. यासाठी २ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे ठरवण्यात आले.

गावातील सरपंच, उपसरपंच निवड ही पोलिस बंदोबस्तात पार पाडावी लागली होती. कारण गावातील महिलाची आधि दारुबंदी मग सरपंच असा निर्धार घेतला आणि ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांना पोलिस बंदोबस्तात थेट सभागृहातच आणण्यात आले होते. या प्रकारामुळे महिलांना संताप अनावर झाला होता. त्यांनी याचा निषेधही केला होता. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही निवड प्रक्रिया पार पडली होती.

धर्माबाद तालुक्यातील नायगाव दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांमुळे सर्वत्र परिचित झाले होते. गावातील असलेल्या दारूच्या दुकानामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मोठ्यांसोबत लहान मुलेही दारू पित असल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. दरम्यान, ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले होते. त्यावेळी सरपंच, उपसरपंच यांची निवड होणे बाकी होते. त्यामुळे या कार्यवाहीला वेळ लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!