औरंगाबाद : विविध प्रकारच्या टीका करण्यामुळे कायम चर्चेत राहणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. मला पराभूत करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभे केले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर इम्तियाज जलील हे खैरे यांचे चेले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कायमच चर्चेत असतात. आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपण राजकारणात सक्रिय असल्याचे दाखवले होते. आता आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याच बरोबर त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाना साधला आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरही त्यांनी शिवसेना आणि एमआयएमवर टीका केली. शहरातील नागरिकांना विकासाची आवश्यकता आहे. मात्र, त्या विषयी दोन्ही पक्ष बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता माझा पक्ष मनपा निवडणुकीत पूर्ण शक्ती लावणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : संजय राठोडांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वर्षावर दाखल
- भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे : मलिक
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
