Share

‘पवार फक्त नाराज होणार पण राठोडांवर कारवाई नाही होऊ देणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल असणारे संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातला एक मंत्री अश्या प्रकरची गर्दी जमवत असेल, तर ते सरकारच्या प्रतिभेला शोभत नसल्याने पवार नाराज झाले आहेत.

दरम्यान, यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी यावरून पवारांवर टीका केलीये. ‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… एक निरपराध मुलीचा जीव गेला तेव्हा नाराजी कुठे गेली होती??? एखादं युद्ध जिंकल्यासारखा एक हत्येचा आरोपी बिनधास्त फिरतो. त्यावर पवार साहेब फक्त नाराज होणार पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई नाही होऊ देणार’, अशा आशयाचे ट्वीट करत निलेश राणेंनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!