🕒 1 min read
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खंडित झालेली नांदेड येथील विमानसेवा आता पुर्वपदावर येत आहे. यात आणखी दोन नवीन विमानाची भर पडल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. येत्या २ मार्च पासून नांदेड शहर हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबाद येथे जाणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान यांनी सांगितले आहे.
येथील प्रसिद्ध गुरुद्वारामुळे जगभरातील भाविक मोठया प्रमाणात नांदेडला भेट देण्यासाठी येत असतात. नांदेड येथील विमानतळ उत्तम दर्जाचे असून या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना संसर्गापुर्वी नांदेडहून मुंबई, हैद्राबाद, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी विमानसेवा सुरू होती. परंतु कोरोनामुळे काहीकाळ विमानसेवा पूर्णतः खंडित झाली होती. मात्र आता ट्रुजेट या कंपनीने हैद्राबाद-नांदेड-मुंबई व मुंबई-नांदेड-हैद्राबाद ही परतीची सेवा असलेली मंगळवार, बुधवार, गुरुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईला जाण्यासाठी दररोज विमान असले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली होती. त्यांच्याच पुढाकारातून आता आठवड्यातील सोमवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशीही नांदेडकरांना विमानाने मुंबईला जाता येईल. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या विमानाने नांदेडच्या प्रवाशांना जळगाव आणि अहमदाबाद असाही प्रवास करता येणार आहे. यापूर्वी सुरू असलेली ट्रुजेटची तीन दिवसांची विमानसेवा तशीच असून उर्वरित चार दिवसात ट्रुजेटचे विमान सकाळी ९.४५ वाजता अहमदाबादहून निघून जळगावला ११.५ मिनिटाला पोहोचणार आहे. ११.३० मिनिटानी जळगावहून निघून हे विमान १२.४५ मिनिटाला मुंबईला पोहोचेल. मुंबईहून १.२५ मिनिटाला निघणारे हे विमान नांदेड येथे ३ वाजता येईल. या नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेमुळे दररोज मुंबईला जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाहीत”
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिची फाशी टळणार ?
- नांदेड मनपा कर्मचाऱ्यासाठी खुशखबर! सातवा वेतन आयोग होणार लागू
- पुणे : तडीपार असतानाही सराईत गुंड हातात कोयता घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
- आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
