🕒 1 min read
नवी दिल्ली- स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनम अलीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
शबनमने कुटुंबातील लोकच तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते यामुळे तिने प्रियकरासोबत मिळून तिने आपल्याच कुटुंबियांना संपविण्याचे दुष्कृत्य केले होते. अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता.
या क्रूरकर्मा महिलेचा राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी दिली जाणार होती मात्र शबनमची फाशी तूर्त टळली आहे. तिने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दया याचिका केली आहे. याचिकेवर राज्यपालांनी निर्णय दिल्यानंतरच शबनमच्या फाशीबाबत डेथ वॉरंट जारी केला जाणार आहे.
शबनमने वकिलांमार्फत जेलरकडे दया याचिकेसाठी अर्ज केला होता. हा अर्ज पुढे राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे दया याचिकेवर निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत शबनमच्या फाशीसाठी डेथ वॉरंट जारी केले जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद शबनमच्या वकिलांनी मंगळवारी अमरोहा न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने डेथ वॉरंट जारी करण्याचा निर्णय पुढे ढकलला.
दरम्यान,वरिष्ठ जेल अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की,फाशीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, परंतु आम्ही तयारी सुरू केली आहे. मृत्यूची वॉरंट निघताच शबनमला फाशी देण्यात येईल.बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड मनपा कर्मचाऱ्यासाठी खुशखबर! सातवा वेतन आयोग होणार लागू
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कराव्यात, मुख्यामंत्र्यांची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
