Share

आठवले साहेब का नारा, अमिताभ बच्चन है फिल्मी दुनिया का तारा !

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहूतील जलसा निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन अमिताभ बच्चन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अमिताभ बच्चन के सन्मान मे, आरपीआय मैदान मे. आठवलेसाहेब का है नारा, अमिताभ बच्चन है फिल्मी दुनिया का तारा !

अशा घोषणा देत आज सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना आरपीआय कार्यकर्त्यानी समर्थन दिले. अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाच्या शूटिंगला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करण्यात आला. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे लवकरच भेट घेऊन पाठिंबा देणार असल्याची माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही, अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करील, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करील; त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा, ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

‘सेलिब्रिटी सिने अभिनेते हे पेट्रोल दरवाढी वरून केंद्र सरकार वर टीका करीत नाहीत, असा आरोप करून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे.सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे.

काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला, तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल असे, रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!