Share

शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिट करून आठवड्यात आराखडा सादर करा: जिल्हाधिकारी

Published On: 

लातूर : जिल्ह्यातील मोठी शासकीय रुग्णालय इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा एकदा अत्यंत सूक्ष्म व काटेकोरपणे फायर ऑडिट करावे. तसेच आग प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या साहित्य व उपकरणाचे संयुक्त अंदाजपत्रक एका आठवड्याच्या आत सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग व अग्निशमन विभागाने शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील इमारती, स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय उदगीर या इमारतीचे केलेले फायर ऑडिटनुसार सादर केलेले अंदाजपत्रकावर समाधानकारक नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे पुन्हा अत्यंत सूक्ष्म व काटेकोरपणे आग प्रतिबंधासाठी संयुक्त आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

ज्याठिकाणी आगीचा जास्त जास्त धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी प्राधान्य देऊन तात्काळ आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त अंदाजपत्रक सादर करुन आग प्रतिबंधसाठी आवश्यक असलेली उपकरणे घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून शक्य तेवढा निधी उपलब्ध केला जाईल व अधिकचा निधी राज्य शासनाकडून मागणी करून कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे त्यामुळे अवश्यक असलेले अंदाजपत्रक त्वरित सादर करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सूचित केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!