पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटलांनी केल आहे.
काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल आहे. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे.
संजय राऊत आज पुण्यात आहेत. त्यांनी विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच संचार घेतलेला आहे. राऊत म्हणाले, ‘अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करणे हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्यांचा विनोद होतो.’ असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
तसेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. आताची आणीबाणी ही छुप्या पद्धतीने आहे, तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. त्या काळातले सेलिब्रेटी कमिटेड होते, स्वातंत्र्य लढा, सामाजिक चळवळीशी संबंध होता, असं म्हणत राऊत यांनी सेलिब्रेटींनी देखील सुनावले.
महत्वाच्या बातम्या
- शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिट करून आठवड्यात आराखडा सादर करा: जिल्हाधिकारी
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! प्रश्न विचारा आणि एका मेलवर उत्तर मिळवा
- ‘भाजपबरोबर युती करून कसे चालेल?’, काँग्रेसचा शिवसेना-राष्ट्रवादीला प्रश्न
- वीज जोडणीसाठी खांबावर चढलेल्या शेतकऱ्याला शॉक
- मनपा पथक रस्त्यावर; कोरोना नियम तोडणाऱ्या नागरिकांना बजावला दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

