Share

छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्याने शिवभक्तांसह भाजप, मनसे व इतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील सामन्यांचा उल्लेख हा व्हायरल होत असतो. आज शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे. मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात खुद्द राज ठाकरेंचा आवाज आहे.

‘ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती… कालही, आजही आणि उद्याही!’ असं म्हणत राज ठाकरेंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील एका घटनेचा आधार घेऊन प्रेरणादायी व्हिडीओ सादर केला आहे. ‘एके दिवशी सुभाषचंद्र बोस हे सिंहगडावरती आले होते.त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन! त्यांत काही बंगाली कवी होते, लेखक होते. आणि सुभाषबाबूंनी त्या लेखकांना सांगितलं की जर काही लिहायचं असेल तुम्हाला आयुष्यात तर ‘शिवाजी’ या तीन अक्षरांबाबत लिहा. जर कविता करायच्या असतील तर या माणसावरती करा. यांच्यावर तुम्ही जेवढ लिहाल, जेवढं लोकांपर्यंत पोहचेल तेवढं तेवढं स्वातंत्र्य आपल्या जवळ यायला लागेल.’ असा संदेश देताना परकीय आक्रमणांमुळे पारतंत्र्यात गेलेल्या भूमीसाठी हिंदवी स्वराज्याचा लढा उभा करण्यापासून ते इंग्रजांच्या छळातून भारताला स्वातंत्र्य देण्यापर्यंत छत्रपती कसे प्रेरणादायी ठरले हे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!