औरंगाबाद : मिशन मरीयम मिर्जा मोहल्ला लायब्ररीच्या अंतर्गत रीड अँड लीड फाऊंडेशन आणि फेमच्या वतीने नारेगाव येथे मोहल्ला लायब्ररी सुरू करण्यात आली. मराठी गजल सम्राट इलाही जमादार यांच्या स्मरनार्थ या लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. ‘तुम मुझे पांच हजार रुपये दो मै तुम्हे एक लायब्ररी दुंगी’ या मरीयम मिर्जाच्या ह्या आवाहनाला शहरातील दानशुर व्यक्ति कडुन चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.
नुकतेच जमील अहमद खान यांच्या हस्ते मराठी गजल सम्राट इलाही जमादार मोहल्ला लायब्ररीचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नारेगाव महानगरपालिका हायस्कूलचे शिक्षक अलीम सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रीड अँड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी प्रस्तावना मांडताना सांगितले कि,’सहाव्या इयत्तेच्या उर्दू माध्यमाची मिर्जा मरीयमने एक अभियान औरंगाबाद शहरातील गल्ली मोहल्ला येथील मुलांसाठी सुरु केले. त्यांना वाचनाची गोडी आणि पुस्तकांच्या प्रती रुची निर्माण करण्याकरीता एक मोहिम ‘मोहल्ला लाईब्रेरी’ सुरू केली आहे.
मरीयम मिर्जाने नेताजी सुभाष चंद्र बोस प्रमाणे एक घोषणा व आवाहन केले आहे कि ‘तुम मुझे पांच हजार रुपये दो मै तुम्हें एक लाईब्रेरी दुंगी’ मरीयम मिर्जाच्या ह्या आवाहनाला शहरातील दानशुर व्यक्ति कडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत शहरात पाच मोहल्ला बाल वाचनालय सुरू झाले आहे.
रीड अँड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करताना वर्तमान काळात वाचन, वाचनालय आणि पुस्तकांच्या प्रति जागरूकता व रुची किती गरजेची आहे. याविषयी सांगितले.
यावेळी शेख मुस्तकिम, शेख मुश्ताक, कादरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिर्जा तालेब बेग यांनी परीश्रम घेतले. आभार प्रदर्शन अलीयार खान यांनी मानले.
महत्वाच्या बातम्या
- अन्यथा रस्त्यावर उतरुन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवु: अभय साळुंके
- खुशखबर! ‘या’ तारखेपासून जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- धक्कादायक! मामाचा तेरा वर्षीय भाचीवर अत्याचार


