Share

‘ठाकरेंची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे जिथे मटन पार्टीला परवानगी आहे मात्र शिवजयंतीला नाही’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात एका बाजूला शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले असताना दुसऱ्या बाजूला मात्र राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोन्ही बाजूंचे सभा,मेळावे धुमधडाक्यात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात येत्या शनिवारी ‘वशाटोत्सवाचं’आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत,प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेला काळजी घ्या असे सांगत शिवजयंतीवर निर्बंध घालत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे नेते जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.

राज्यात कोरोना पुन्हा वाढत असल्याचं चित्र आहे.मग राष्ट्रवादीच्या वशाटोत्सवाला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सोशल मीडिया विशेषज्ञ,लेखिका शेफाली वैद्य यांनी ठाकरे सरकारच्या मर्मावर बोट ठेवत राज्य सरकारचा दुटप्पीपणा जनतेच्या समोर आणला आहे.

१९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले जातात मात्र २० फेब्रुवारी रोजी मटन पार्टी जी शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे तिला मात्र परवानगी आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे असं म्हणत ठाकरे सरकारच्या कारभारावर वैद्य यांनी ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी देखील या मुद्द्यावरून टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर निर्बंध, अनेक ठिकाणी जमावबंदी आणि संचार बंदी लागू करण्याचे आदेश आहेत,पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात एकही नेता त्यांच्या घरी सांत्वनाला जात नाही.हे सर्व नियम सर्वसामान्यांना लागू आहेत का? असा प्रश्न पडत आहे. कारण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले आहे आणि असं समजतंय की या कार्यक्रमाला पवार साहेब, संजय राऊतसाहेब ,धनंजय मुंडे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मग या उत्सवाला परवानगी कुणी दिली, या उत्सवामध्ये सुद्धा 100 जणांनी सहभागी व्हायचे, असे निर्बंध का नाही लादले? महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना वेगळे नियम लागू आहेत का आणि त्यांना सर्व सूट आहे का? याचे उत्तर या सर्व नेत्यांनी द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!