Share

पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

गेल्या १२ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाही. मंत्रिमंडळाची 17 फेब्रुवारी रोजी बैठक झाली या बैठकीला राठोड यांनी दांडी मारली. मात्र, ते इतर नेत्यांच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

पूजा चव्हाण प्रकरणी योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जावी यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. आता पुणे पोलीस देखील गेल्या दोन दिवसांपासून ऍक्शन मोडमध्ये आले असून काही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात आली आहे. यासोबतच, ‘ आवश्यकता असल्यास वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी करण्यात येईल,’ असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!