औरंगाबाद : राज्य सरकारने मंजूर केलेल्या नवीन जलवाहिनी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे सध्या शहराची परिस्थिती लक्षात घेता शहरवासीयांना मुबलक पाणी देण्यासाठी पाणीपुरवठ्यात २५ टक्के वाढ करण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त यंत्रणा उभी करणार आहे. यामुळे शहरातील पाणी प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात तरी सुटेल.
त्यानुसार नवीन जलयोजनेसाठी जलकुंभांच्या जागा निश्चित करून त्या ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची समिती स्थापन केली आहे. शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १६८० कोटींच्या नवीन जलयोजनेचे काम आता सुरू झाले आहे. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदार सर्वेक्षण करून कामास प्रारंभ केला आहे.
जलयोजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात शहराच्या पाणी पुरवठ्यात किमान २५ टक्के वाढ करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याचे पानझडे यांनी सांगितले. सध्याची जुनी जलयोजना १५० एमएलडी क्षमतेची आहे. १४५ एमएलडी पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होते आणि १२५ एमएलडी एवढेच पाणी शहरात येते.
त्यात आणखी वीस ते पंचेवीस टक्के वाढ करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबद्दल नुकतीच चर्चा झाली. त्यानुसार आता ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटेल, त्या ठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीला समांतर जलवाहिनी टाकली जाणार आहे. नवीन जलयोजनेचे काम पूर्ण झाल्यावर ही समांतर जलवाहिनी नवीन योजनेला जोडली जाणार आहे.
जलकुंभांचे काम आधी पूर्ण करणार
नवीन जलयोजनेतून ५३ नवीन जलकुंभ बांधले जाणार आहेत. त्यापैकी २५ जलकुंभ प्राधान्य क्रमाने आधी बांधावे लागणार आहे. जलकुंभ बांधण्यासाठीची जागा ताब्यात घेऊन, सातबाराच्या उतार्यावर पालिकेचे नाव लाऊन त्या जागा एमजेपीकडे हस्तांतरीत करण्यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, किरण धांडे या वरिष्ठ अधिकार्यांची समिती स्थापन केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन
- लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

