Share

‘पक्षांतर बंदीचा कायदा क्षीरसागरांना लागू होत नाही का?’

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर यांचे समर्थक असलेले बाळासाहेब गुंजाळ, भय्यासाहेब मोरे, रंजीत बनसोडे, गणेश तांदळे व प्रभाकर पोपळे या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.  पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दाखल केलेली तक्रार अगदी योग्य आहे. पक्षांतर करणाऱ्यांचे समर्थन आपण करू शकत नाही. परंतु उपाध्यक्षांचे चुलते नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, भाऊ नगरसेवक योगेश क्षीरसागर व भावजयी नगरसेविका भारती राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेला भाजपा उमेदवार प्रीतमताई मुंडे व विधानसभेला शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा प्रचार खुलेआम केला होता. मग त्यांच्यावर कारवाईची मागणी का केली नाही असा सवाल पालिकेतील गटनेेते फारूख पटेल यांनी केला.

पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे की, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आपल्या स्वकर्तृत्वाने राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या तसेच ज्यांनी जिवाचं रान करून आमदार संदीप क्षीरसागरांच्या विधानसभेतील विजयात भरीव योगदान दिलं अशा नगरसेवकांवर उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी कायद्याचा बडगा उगारलेला आहे. तो योग्यही आहे. परंतु, कुटूंबातील सदस्यांविरोधात कारवाईची मागणी न केल्यामुळे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आपण लवकरच पक्षातील वरिष्ठांना भेटून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असेही पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे.

विषय समित्यांबाबत नगरसेवकांत खंत
गेल्या वर्षी व यावर्षी पालिका सभागृहात बहुमत होत असतानाही विषय समित्यांची (सभापती) निवडणूकच लढवली गेली नाही, ही अतिशय गंभीर बाब देखील आपण पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. जर मागील दोन्ही वर्षी पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुका लढवल्या असत्या तर सर्वसामान्य कुटुंबातील आमचे सर्वच नगरसेवक सभापती झाले असते. परंतु समित्या बिनविरोध बहाल केल्यामुळे हे होऊ शकलं नाही, अशी खंत व्यक्त करतानाच ही बाब वरिष्ठांपुढे मांडणार असल्याचे पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!