Share

‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे

Published On: 

औरंगाबाद : नगर विकास विभागाने काही दिवसांपूर्वी अचानक स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिलेली असतानाही मनोहरे यांनी सीईओपदी रुजू होण्याचा प्रयत्न केला. मनपा आयुक्त पांडेय यांचे या पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीही त्यांचे चांगले संबंध जुळून आल्याचे दिसून येते. मात्र, मनोहरे यांचे शहरात येणे वेगळेच संकेत देत आहेत. त्यामुळे या स्मार्ट खेचाखेचीत कोण अव्वल येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महापालिका आयुक्त मागील ५ वर्षापासून स्मार्ट सिटीचे पदसिद्ध सीईओ म्हणून काम पाहत आहेत. मंडळामध्ये ज्या पद्धतीने महापौर आणि इतर पदाधिकारी सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे सीईओ म्हणून महापालिका आयुक्त काम पाहतील, असे ठरले आहे. विद्यमान सीईओ आस्तिककुमार पाण्डेय चांगल्या पद्धतीने कामकाज पाहत आहेत.

नगरविकास विभागाने अचानक १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे महापालिका प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना धक्का बसला. आगामी काही वर्षांमध्ये स्मार्ट सिटीच्या विविध विकासकामांचे नियोजन त्यांनी केले होते. चांगले काम सुरू असताना थेट आयएएस अधिकारी नसलेले मनोहरे यांची नियुक्ती कशासाठी? यामागे नेमके कोण आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

सुभाष देसाई यांनी त्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिलेली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही पांडेय यांना सीईओ पदी कायम ठेवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.

गुरुवारी आठ दिवसानंतर मनोहरे औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांनी शासन आदेशानुसार आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजू होत असल्याचे पत्र महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवून दिली. या प्रकारासंदर्भात महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सीईओ पदावर शासनाने केलेल्या नियुक्तीसंदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या पदावर कोणीही रुजू झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!