🕒 1 min read
जालना : लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीच्या पाठीवर चाकूने वार करून, त्याच्या जवळीत दीड लाख रुपयांची रक्कम भामट्यांनी लुटल्याची घटना गुरुवारी शहरातील ईदगाह जवळ घडली. समीर शेख जमील राहणार दु:खीनगर असे या जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.
लसूण-अद्रकचा व्यवसाय करणारे व्यापारी समीर शेष जमील हे आपला व्यावसाय करून दुचाकीने जात होते. रस्त्यात लघुशंका आली म्हणून ते ईदगाहजवळील पुलाजवळ थांबले. मात्र, त्यांच्यावर नजर ठेऊन असलेल्या दोन जणांनी दुचाकीहून येऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, एकाने हातातील चाकूने समीर यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. यानंतर हातातील पिशवी आणि खिशातील दीड लाख रुपये घेऊन ते पसार झाले. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन
- लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान


