🕒 1 min read
नागपूर : लॉकडाऊन दरम्यान आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत असतानाच महावितरण विभाग वाढीव वीज बिल आकारात असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दिवाळीपासून वाद सुरु आहे. भाजपने वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलने केली होती.
लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली.
दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये दिले होते. १०० युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल, असे नितीन राऊत यांनी २०२० मध्ये सांगितले. मात्र, आता राऊत यांनी अजूनही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर यु-टर्न घेतल्याचा आरोप करत आहे.
दरम्यान, १०० युनिट वीज बिल माफी देणार, असं आपण सांगितलंच नव्हतं असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे. १०० युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालयांवर मनपाच्या पथकांचा वॉच
- ‘पूजा अरुण राठोड’च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण’
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’
- ‘पेशंट रस्त्यांवर बोंबलत फिरताहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा’, सुनिल केंद्रेकरांचे आदेश
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

