🕒 1 min read
बंगरूळ : अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत देणग्यांच्या स्वरुपात १ हजार ५११ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे.
या निधी संकलनावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे. ‘राम मंदिर निधी समर्पण अभियान’चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला.
त्यांनतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी राम मंदिरासाठी देणगी देणार नसल्याचे सांगितले आहे. राम मंदिरासाठी देणगी मागायला आले, तर त्यांना सांगेन की, अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरासाठी काही झाले तरी देणगी देणार नाही. त्यामुळे दुसरीकडे बांधल्या जात असलेल्या राम मंदिरासाठी देणगी देईन, असे सिद्धारामैय्या यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर प्रकरणी तोडगा निघाला असला, तरी वाद कायम राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सिद्धारामैय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत कर्नाटक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहिती सिद्धारामैय्या यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्या कुमारस्वामींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मीडिया प्रभारी ई.एस प्रदीप यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी ते लायक नाहीत’, असा घणाघात ई.एस प्रदीप यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Toolkit Case: आरोपी शांतनुला तात्पुरता अटकपूर्व जामीन, दिशालाही मिळाला ‘हा’ दिलासा
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
