🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षिततेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचा गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात भारत-चीनवर निर्माण झालेला तणाव चर्चेद्वारे कमी झाल्यामुळे दोन्ही देशाचं सैन्य मघादी फिरत असल्याचं केंद्र सरकारद्वारे सांगण्यात आलं होतं. यावर देखील राहुल गांधी यांनी आक्षेप घेत केंद्र सरकारवर टीका केली होती.
राहुल गांधींच्या या टीकांवर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी चोख उत्तर दिलं आहे. ‘अर्जुन एम के १ ए हा लढाऊ रणगाडा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने उत्पादित केला आहे. या लढाऊ रणगाड्याला हंटर किलर रणगाडा असेही म्हटले जाते,’ असं सांगतानाच देशाचा संरक्षण विभाग सक्षम असतानाही राहुल गांधी मात्र वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून विनाकारण अपप्रचार करत आहेत,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तर, ‘कांग्रेसच्या खोटारडेपणाच्या राजकारणामुळे ४०० जागांवरुन काँग्रेसला सध्या फक्त ४० जागा कशाबशा टिकविता आल्या. भविष्यातही अशीच परिस्थिती राहली तर काँग्रेस पक्ष हा इतिहासातजमा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या गोष्टींचे लवकरच आत्मचिंतन केल्यास ते त्यांच्यासाठी व काँग्रेससाठीही नक्कीच हिताचे असेल,’ असा टोला देखील पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- राणे आणि फडणवीस जोडीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत – नवाब मलिक
- फासे पलटणार ? आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही; मलिकांची फडणवीसांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
