Share

राणे आणि फडणवीस जोडीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत – नवाब मलिक

Published On: 

परभणी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यामुळे सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन भिन्न विचारांचं पक्ष फारकाळ टिकणार नाही अशी टीका सातत्याने भाजप नेत्यांनी केली होती.

मात्र, महाविकास आघाडीने वर्षपूर्ती केली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा सरकार पडणार असल्याचे भाकीत केलं आहे. तर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच फासे पलटतील असं विधान केलं होतं. यावर, राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

‘राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत’ अशी मिश्किल टिपण्णी नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना अंतिम श्वासापर्यंतची शत्रू नाही, असं विधान केलं होतं. तर, ‘भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात. या भेटीनंतर ते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करु पाहत आहेत,’ असा आरोप नवाब मलिक  याआधी देखील केला होता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!