परभणी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यामुळे सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन भिन्न विचारांचं पक्ष फारकाळ टिकणार नाही अशी टीका सातत्याने भाजप नेत्यांनी केली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच फासे पलटतील असं विधान केलं होतं. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी खोचक टीका केली आहे. ते परभणीत माध्यमांशी संवाद साधत होते.
‘शिवसेनेशी फारकत घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे, हे सगळ्यांनाच चांगले माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू, अशी भाषा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली, हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही,’ असं भाष्य नवाब मलिक यांनी केलं आहे.
राणे आणि फडणवीस जोडीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत !
‘राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत’ अशी मिश्किल टिपण्णी नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चौकशीत संजय राठोड दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच – गुलाबराव पाटील
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- राणे आणि फडणवीस जोडीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत – नवाब मलिक
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
