जळगाव : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली आहे. राठोड यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे, चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच मात्र तोपर्यंत अधिक बोलणं उचित होणार नाही,’ असं भाष्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा ?
या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं आहे. राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजय राठोड यांची नियमांनुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’नंतर आता शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान !
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- राणे आणि फडणवीस जोडीने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत – नवाब मलिक
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
