Share

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द ठार; बायपासवरील निशांत पार्कसमोरील घटना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : लग्न समारंभासाठी आल्यावर मुलाला भेटून त्याच्या दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत वृध्दाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास बीड बायपासवरील निशांत पार्कसमोर घडला. आश्रुबा भीमराव राऊत असे मृत वृध्दाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जिल्हाधिका-याच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी आश्रुबा राऊत शहरात आले होते. त्यांचा अभियंता मुलगा विष्णू हा बीड बायपासवर राहतो त्यामुळे राऊत त्याला भेटण्यासाठी दुपारी घरी गेले. मुलाची भेट झाल्यानंतर त्याने वडिलांना विवाहस्थळी सोडतो असे सांगितले. त्यामुळे दोघेही दुचाकीने बायपासवरील निशांत पार्कसमोरुन जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक चालकाने विष्णू यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या आश्रुबा राऊत यांना ट्रकने चिरडले. तर विष्णू यांना देखील जबर दुखापत झाली.

अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या राऊत यांना घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुपारी पावणेचारच्या सुमारास मृत्यू झाला. राऊत पिता-पुत्राला ट्रकने धडक दिल्याचे पाहून बायपास रस्त्यावरील अनेक वाहनधारकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी सहानुभूती दाखविण्याचा आव आणणा-या एकाने मृत राऊत यांच्या खिशातील पैसे व महत्त्वाची कागदपत्रेच गायब केली. हा प्रकार घाटीत गेल्यानंतर विष्णू यांच्या लक्षात आला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार शेषराव चव्हाण करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!