Share

रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या

Published On: 

जालना : पाहेगाव येथील शिवसेना कार्यकर्ते रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी सिंदखेडराजा येथे आणखी दोन जणांना अटक केली आहे. आकाश रामेश्वर कुहिरे आणि कृष्णा यादवराव चौधरी असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सेवली ठाण्याचे उपनिरीक्षक विलास मोरे यांनी ही माहिती दिली आहे.

पाहेगाव येथील शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या भावानेच दिल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. खून करणाऱ्या आरोपींनी ८ फेब्रुवारी रोजी शेळके यांना आधी दारू पाजली, नंतर गळा आवळत डोक्यावर दगड विटांनी वार केले. यानंतर कारमध्ये बसवून, वरून रॉकेल, पेट्रोल टाकून ती पेटवून देत कार दरीत लोटून दिल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. या प्रकरणात रामप्रसाद नामदेव शेळके, सचिन रामप्रसाद शेळके, संदीप रामप्रसाद शेळके, विशाल विठ्ठल काळे, अर्जुन बाबासाहेब दांडाईत, अभिमन्यू अर्जुन दांडाईत एक महिला अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे.

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार मृत रमेश शेळके यांचे आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके याच्या विरोधात वडिलोपार्जित जमिनीचा वाद होता. हे प्रकरण 2018 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना दोन्ही भावांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि संशयावरून आरोपी ताब्यात घेतले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!