🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) साठी खेळाडूंचा लिलाव हा गुरुवारी चेन्नईत होणार आहे. या लिलावात कोणती टीम कोणते खेळाडू खरेदी करणार याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सर्वच टीम नव्या दमानं नव्या सीझनमध्ये खेळण्यासाठी या लिलावात खास योजना तयार करुन उतरणार आहेत.
या वर्षी होणाऱ्या सिझनपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमनं आपलं नाव बदललं आहे. या सिझनपासून या टीमचं नाव पंजाब किंग्स (Punjab Kings) असेल. पहिल्या सीझनपासून खेळत असूनही एकदाही आयपीएल न जिंकणाऱ्या तीन टीममध्ये प्रिती झिंटाच्या या टीमचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच काळापासून या टीमचं नाव बदलण्यावर विचार सुरू होता. बुधवारी एका कार्यक्रमात नव्या नावाची आणि नव्या लोगोची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- “त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
