Share

नांदेडच्या गुरपिंदसिंगची पुराव्याआभावी मुक्तता

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : आठ दिवसांपुर्वी संशयित खलिस्तानी दहशतवादी म्हणुन अटक केलेल्या गुरपिंदसिंगची अमृतसर न्यायालयाने पुराव्या आभावी मुक्तता केली आहे. गुरपिंदर सिंग याला खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा सदस्य असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली होती. पण अमृतसर कोर्टाने त्याला पुराव्या आभावी निर्दोष मुक्त केले.

खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा एक आरोपी अमृतसर पोलिसांच्या ताब्यात होता. त्यांने पंजाब पोलिसांना गुरपिंदर सिंग हा त्यांचा साथीदार आहे अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे नांदेड शहरातील शिकारघाट परिसरात पंजाब पोलिस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ७ फेब्रुवारी रोजी गुरपिंदरसिंग संतसिंग याला खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातुन अटक केली. लॉकडाउन पासुन तो नांदेडमध्येच वास्तव्यास होता.

अटकेनंतर पंजाब पोलिस त्याला घेऊन अमृतसर पंजाब येथे घेऊन गेले. यानंतर त्याला अमृतसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. देशविरोधी किंवा कटकारस्थान केल्याप्रकरणात त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याने अमृतसर येथील न्यायालयाने शनिवारी त्याची मुक्तता केली आहे. तपासात तो दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वत: कोर्टात रिपोर्ट दाखल करुन त्याची निर्दोष मुक्तता केली. अशी माहिती नांदेड गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!