Share

पुण्यात कोरोना पुन्हा वाढतोय ; रुग्णसंख्या १६८३ वर

Published On: 

पुणे : पुणेकरांनो सावधान ! कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळाच. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

पुण्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसतो आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा आता १०% पर्यंत जाउन पोहोचला आहे. पुण्यात सोमवारी एकूण १९३ नव्या रुग्णांची भर पडली. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या १६८३ वर पोहोचली असून आज १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारी दिवसभरात १०० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ८६८ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती. मात्र या आठवड्यात त्यात भर पडली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २०१४ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेले ७०७ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सक्रीय असलेल्या १३०७ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण २०१४ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. सोमवारी दिवसभरात २५१ घरांना भेटी देऊन ८७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!