Share

जालना जिल्ह्यासाठी २६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; ७९ कोटींचा वाढीव निधी

Published On: 

🕒 1 min read

जालना : औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक सोमावारी पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात २६० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

शासनाने १८१ कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित करुन दिली होती, यात उपमुख्यमंत्र्यांनी ७९ कोटींची वाढ केली आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी २६० कोटींचा निधी मंजूर करत असून यापैकी १० कोटी रुपये क्रीडा संकुलासाठी दिले आहेत. उपलब्ध करून दिलेल्या निधीतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावी, सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्यसेवा सक्षमीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.

दरम्यान, या बैठकीत आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी विकास कामांसाठी निधीची मागणी केली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी अधिकच्या निधीची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!