Share

इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेत विविध कामांसंदर्भात अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. यात अतिक्रमणाविषयी बर्‍याचशा तक्रारी येत आहेत. प्राप्त तक्रारींवरच कार्यवाही करण्यात अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे. त्यामुळे विकासकामांत अडथळा येत असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. यात मनपा निवडणूकीत उभे राहण्यासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र यामुळे आयुक्तांची डोकेदुखी वाढली आहे.

आगामी पालिका निवडणुकीमुळे या तक्रारी वाढल्या असाव्यात, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात पालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रत्येकजण आपापली छबी निर्माण करण्यासाठी विविध कामांविषयी पालिकेकडे तक्रारी करत आहे. त्यामुळेच तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असावे, असा कयास आयुक्तांच्या या वक्तव्यामागे बांधला जात आहे.

यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की, विशेष करून प्रशासनाकडे प्राप्त होणार्‍या तक्रारीपैकी अतिक्रमणबाबतच्या अधिक तक्रारी आहेत. तक्रारींची निवेदने देण्यासाठी अनेक शिष्टमंडळे रोज पालिकेत येत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करताना, प्रत्येक शिष्टमंडळाला सामोरे जाता पालिका अधिकार्‍यांना आपला अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात अडथळे येत आहेत, अशा शब्दांत आयुक्त पांडेय यांनी आपली अस्वस्थता प्रसारमाध्यमांसमोर प्रकट केली.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!