Share

चक्क कॉंग्रेस मंत्र्यांकडून मोदी सरकारचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एकीकडे अर्थसंकल्पाला अनुसरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे अर्थसंकल्पातील आरोग्य सेवेवरील केलेल्या तरतुदीवरून स्तुती केली आहे. औरंगाबाद शहरातील घाटीमध्ये झालेल्या समारंभात ते बोलत होते. यामुळे कॉंग्रेसमधील अर्थसंकल्पावरील दुतोंडीपणा समोर आला आहे.

केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सेवेवरील तरतूद वाढवली आहे. ही तरतूद तब्बल ६.७५ टक्के केली आहे अशी स्तुती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील वैद्यकीय शिक्षणासंदर्भात देखील भरीव तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शहरात सध्या अर्थसंकल्पीय आढावाची शेवटच्या टप्प्याची बैठक पार पडत आहे. अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षणासाठी ३.२५ टक्के तरतूद असते. परंतु कोरोनाचे संकट पाहता ही तरतुद भरीव करून केंद्र सरकार प्रमाणे ६ ते ७ टक्क्यापर्यंत करण्यासाठी आग्रही असणार असल्याचे मंत्री देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!