औरंगाबाद : राज्यातील रस्त्याबाबत लोकप्रतिनीधींच्या विरोधात ज्या तक्रारी येत आहेत यावर मी भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सहमत आहे. असे राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद येथे वार्षिक नियोजन प्रारुप आराखड्याला मंजुरी देण्यासाठी शहरात आले असता ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यासाठी सोमवारी बैठक झाली. यात सर्वात प्रथम नांदेड जिल्ह्याचा आढावा पवार यांनी घेतला. या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती देत म्हणाले, दरवर्षी १०-१२ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला जातो. मात्र एवढ्या निधीत रस्त्यांची कामे होत नाहीत. मागील काळातील भाजपच्या सरकाने मराठवाड्यातील रस्त्यांसाठी फारसा निधी दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात चाळीस हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत यास संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या वेळी राज्यातील रस्त्यासाठी १५ हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी केली आहे. राज्यातील रस्त्यांना एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने अधिकचा पैसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी विरोधात तक्रारीबाबच मी गडकरी यांच्या मताशी सहमत आहे, मात्र यावर कारवाई व्हायला हवी, आमच्या अधिकारात असेल ते आम्ही कारवाई करू, तुमच्या अखत्यारीत असेल ती कारवाई तुम्ही करा. असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू
- मुंबई मनपा निवडणुकीसाठी नाना पटोलेंनी दिला ‘स्वबळाचा नारा’
- बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76.5% रुग्ण ‘या’ तीन राज्यात
- ‘भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

