औरंगाबाद : पैठण तालुक्यातील आदिवासी, भिल्ल समाजातील गोरगरीब लोकांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे त्यांची विविध कामे पुर्ण करण्यासाठी आदिवासींच्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले. ते आदिवासी जनजागृती मेळाव्यात बोलत होते.
यावेळी आदिवासी बांधवांचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शबरी योजनेतुन बनविण्यात आलेल्या १०५ घरकुल गृहप्रवेश, खावटी कर्ज वाटप यांवर चर्चा करण्यात आली. आदिवासी भिल्ल समाजासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अशोक बरडे यांनी केली. आदिवासी समाजाच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नासाठी निश्चितच सरकारकडे प्रश्न मांडुन पाठपुरावा करण्याचे अश्वासन यावेळी रोहयो मंत्री भुमरे यांनी उपस्थितीत आदिवासी समाज बांधवांना दिले.
शबरी घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी औरंगाबाद अदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या भालेराव, डॉ.पंडित किल्लारीकर, नगरसेवक तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, अरुण बल्लाळ, किरण पगारे, गौतम साळवे आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- वार्षिक नियोजन आराखडा ३५० कोटींपर्यंत वाढवा, आ.पाटलांचे अजित पवारांना साकडे
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
