Share

एकच फाईट वातावरण टाईट… पडळकरांनी पवारांवर टीका केली आणि अवघी राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटून पडली

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते मात्र शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं.

यावेळी पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

पडळकर यांनी टीका केल्यानंतर अवघी राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यावर तुटून पडली.अजित पवार,जयंत पाटील,अमोल मिटकरी,जितेंद्र आव्हाड,उमेश पाटील,विद्या चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते पडळकर यांच्यावर तुटून पडले. राष्ट्रवादीचे नेते तुटून पडले तर सोशल मिडीयावर पडळकर यांचीच चर्चा जोरात होत होती.

अजित पवार –
‘पडळकर यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे. ‘पडळकरांना जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट मिळून पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालंय. त्यांच्यावर काय प्रश्न विचारता? लोकांनीच ज्यांना नाकारलंय त्यांना इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही. अशा लोकांची काय नोंद घ्यायची?’

जयंत पाटील-
आततायीपणा किती करायचा, या मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे. स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे. सन्मानाने ज्यांना बोलावले आहे. त्यांच्या हस्ते जे उद्घाटन आहे. त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे.

जितेंद्र आव्हाड-
शरद पवारांवर टीका केली की हेडलाइन होते, हे महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांपासून पाहतो आहे. पडळकरांनाही ही कला उमजलीय,’ असा चिमटा आव्हाड यांनी काढला. ‘पडळकरांनी एखाद्या चोरासारखं पहाटेच्या अंधारात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यात हिंमत होती तर दुपारी अनावरण करायचं. सांगून करायचं. उद्या साहेब तिथं येणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा. तुम्हाला पुन्हा कदाचित उभंही राहता येणार नाही.

हसन मुश्रीफ-
ते ज्या भाषेत टीका करतात यावरून यांचा बोलवता धनी फडणवीस असल्याचं समोर आलं…. शरद पवार साहेब यांच्या सारख्या नेत्यांवर कसे आरोप करताय? पवार साहेब यांच्यावर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि पडळकर यांची लायकी काय?..देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना रोखण्याची गरज आहे.. नाहीतर याचे परिणाम पाहायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!