Share

मनपाकडून ४३० किलो प्लास्टिक जप्त, पण ते शहरात आलेच कसे?

Published On: 

औरंगाबाद : शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवायांचे सत्र सुरूच आहे. यासोबतच रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, बायोवेस्ट, प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरोधात देखील दंड आकारणे सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यां विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पकडण्यात आले होते. आजही ४३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दरम्यान, शहरात बंदी असतानाही प्लास्टिक आलेच कसे, इतक्या दिवस प्रशासनाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही. यामागे कोणाचा वरदहस्त तर नाही ना असे विविध प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत.

मनपा नागरी मित्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी गांधीनगर येथे ४३० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. गांधीनगर येथील व्ही. एच. लव्हेरा यांच्या मालकीच्या हरी लक्ष्मी निवास येथील नजीम शेख यांनी एक गाळा भाड्याने घेतला आहे. आज सकाळी नागरी मित्र पथकास या भागात प्लास्टिक आढळून आले. त्यांच्याकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, देविदास सुसर, रोहिदास गडवे, आत्माराम गवळी, बालाजी साबळे आणि पथकातील कर्मचारी यांनी केली.

शहरात आजही अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने प्लास्टिकचा वापर सुरु असल्याचे दिसून येते.किरकोळ भाजीविक्रेते, फेरीवाले, हातगाडी चालक यांच्याकडे ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळून येतात. मोंढ्यातील अनेक दुकानांमध्ये छुप्या मार्गाने प्लास्टिकचा वापर सुरु आहे. फेरीवाल्यांना देखील यांच्याकडूनच पुरवठा केला जातो. मात्र, या सर्व अंतर्गत व्यवहारांवर महापालिकेचा अंकुश नाही. महापालिकेच्या नागरी मित्र पथकाद्वारे कारवायांचे सत्र सुरु असले तरीही अंतर्गत साखळी तोडण्यात ते अपयशी ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!