Share

हांडोरेनंतर अमित देशमुख, मनपा निवडणूकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून पुढील रणनिती ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१४) काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हांडोरेंनी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तर आज (दि.१५) औरंगाबादचे संपर्कप्रमुख तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख शहरात आहेत. काही विकासकामांचे उद्घाटन ते करणार आहेत. तर सायंकाळी शहागंज येथील पक्ष कार्यालयात जनतेच्या विविध समस्या, शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते उपस्थित असणार आहेत.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार अशी चर्चा आहे. असे असले तरी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली असे या पक्षांकडून सांगितले जाते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेसकडून त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा अमित देशमुख यांनी औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गेल्या बैठकीत त्यांनी गांधी भवनातील पक्ष कार्यालयात महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, असे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!